
बेस्ट उपक्रमातर्फे ३० मे रोजी ' तंबाखुमुक्त बेस्ट ' मोहिम राबविण्यात आली. बेस्टमधील एकूण २,००० कर्मचाऱ्यांनी तंबाकू सेवन सोडून दिले आहे, त्यापैकी १०० कर्मचाऱ्यांचा बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे तंबाखुमुक्त मोहिमेत ज्या विभागांनी, आगारांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्यांचा परिवहन अभियांत्रिकी विभागाचा सुवर्ण स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वांद्रे आणि कुर्ला आगार व्यवस्थापकांचा देखील गौरव करण्यात आला. यावेळी बेस्ट उपक्रमाचे सहायक महाव्यवस्थापक सुरेश पवार, मुख्य वाहतूक व्यवस्थापक दयानंद सुर्वे, मुख्य वैद्यकीय अधिकारी अनिल सिंगल आणि बेस्टचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
