बेस्टच्या दक्षता विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा - रवी राजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2017

बेस्टच्या दक्षता विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा - रवी राजा


मुंबई - ४ मे मुंबईची दुपारी लाईफ लाईन बोलली जाणारी बेस्ट आर्थिक तोट्यात असताना बेस्टममधील दक्षता विभागाचे अधिकारी मात्र वीजचोरी करणाऱ्यांना आर्थिक लाभ करून देत असल्याने बेस्ट आणखी तोट्यात चालली आहे. यामुळे वीजचोरी करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून आणि दंडाची रक्कम पूर्ण वसूल व्हावी म्हणून भ्रष्ट दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.

बेस्टच्या व्हिजिलन्स विभागाकडून माहीम येथील स्टेटस रेस्टोरंट आणि बार वर २१ एप्रिल २०१७ ला धाड टाकून विद्युत चोरी पकडण्यात आली होती.दक्षता विभागाला मीटरमध्ये टेम्परिंग करण्यात आल्याचे उघड झाले होते. यामुळे दक्षता विभागाने बार मालकाला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र दक्षता विभागाने बार मालकासोबत तडजोड करून फक्त २ कोटी रुपये दंड वसूल केला. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला ३ कोटी रुपयाचे नुकसान झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून बार मालकाकडून ५ कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

इलेक्ट्रिक सिटी कायदा १३५ नुसार विद्युत चोरी पकडली गेल्यावर त्याची रक्कम बेस्टकडे भरावी लागते. मात्र दक्षता विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बार मालकाबरोबर लाखोंची देवाण घेवाण करत ५ कोटींचा दंड २ कोटी रुपये केला. बेस्ट आर्थिक तोट्यात असून बेस्ट बंद पडण्याच्या मार्गावर आहे. असे असताना वीज चोरीची संपूर्ण रक्कम भरण्यास सांगण्या ऐवजी बार मालकाकडून २ कोटी रुपये वसूल केल्याने बेस्टला ३ कोटी रुपयाचा आर्थिक फटका बसला आहे. अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे बेस्ट आर्थिक डबघाईला आली असल्याने अश्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे.

Post Bottom Ad