पावसाळ्यात हिंदमाता, सायन व गांधी मार्केट परिसरात पाणी साचणार - रवी राजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2017

पावसाळ्यात हिंदमाता, सायन व गांधी मार्केट परिसरात पाणी साचणार - रवी राजा

महापालिका व एनजीओ चार वार्डमधील नाले सफाई करणार - 
मुंबई / प्रतिनिधी - नाले सफाई करण्यास कंत्राटदार आले नसल्याने मुंबईमधील शहरातील हिंदमाता, सायन व गांधी मार्केट या विभागात यावर्षी पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. यामुले आता एनजीओ आणि महापालिका स्वता चार वार्ड मधील नाले सफाई करणार आहे अशी माहिती महापालिकतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली. 

मुंबई महापालिकेत नाले सफाई घोटाळा उघड झाल्यावर कंत्राटदार, थर्ड पार्टी ऑडिटर, आणि एसडब्लूडी विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकताना अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुले यावर्षी अनेक विभगात नाले सफाई करण्यासाठी कंत्राटदार आलेले नाही.

मुंबई महापालिकेच्या एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण या चार विभागात मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी कंत्राटदार पुढे आलेले नाहित. या चार विभागात अनेक मोठे नाले भुयारी असल्याने नाले सफाई करण्यास कंत्राटदार पुढे आले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नाले सफाई झाली नसल्याने आता एनजीओना काम दिले जाणार आहे. तसेच महापालिकेच्या वार्डकडूनही नाले सफाईचे काम केले जाणार आहे.

त्यासाठी मुख्य अभियंता यांच्याकड़े वार्डकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. लवकरच या चार वार्ड मधील मोठ्या नाल्यांची एनजीओ आणि महापालिकेकडून सफाई केली जाणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. या चार वार्ड मध्ये अद्याप नालेसफाई झाली नसल्याने शहरातील हिंदमाता, सायन व गांधी मार्केट या विभागात यावर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता रवी राजा यांनी वर्तवली आहे.

एफ उत्तर विभागात नाले सफाई बंद >>>
पालिकेच्या एफ उत्तर विभागात नाले सफाई करण्यास कंत्राटदार आले नाही. या विभागात 14 मोठे नाले असून या नाल्यांच्या सफाईसाठी 20 एनजीओना काम दिले जाणार आहे. या वार्ड मधील छोटे नाले सफाई झाल्यावर गाळ रोडवर किंवा नाल्या किनारी टाकला जात आहे. आता गाळ महापालिका स्वता उचलून टाकणार आहे अशी माहिती वार्ड मधून देण्यात आली आहे.
रवी राजा - विरोधी पक्ष नेते

Post Bottom Ad