रामदास आठवले 7 मेला पूर्णाला भेट देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2017

रामदास आठवले 7 मेला पूर्णाला भेट देणार

मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकारांच्या जयंती निमित्त परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगड़फेक झाल्यानंतर या घटनेचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला होता. राज्यात पूर्णा प्रकरणाच्या विरोधात निषेधाचे वादळ उठले होते. त्या पूर्णा शहरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे येत्या 7 मे रोजी सकाळी भेट देणार आहेत.

पूर्णा प्रकरण घडल्यानंतर रामदास आठवले यांनी तात्काळ तेथील पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून गुन्हेगारांवर कठोर कार्रवाई करून दोन्ही समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे निर्देश दिले होते. पूर्णा येथील भीमजयंती मिरवणुकीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच दलितांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, अत्याचारग्रस्त दलितांना शासकीय मदत तसेच रिपाइंतर्फे मदत करण्यासाठी तसेच पूर्णा येथील जखमी दलितांच्या कुटुंबियांची रामदास आठवले भेट घेणार आहेत. याच बरोबर औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यातील रिपाइं कार्यकर्त्यांना आठवले भेटणार असल्याचे रिपाइंतर्फे प्रसिद्धि पत्रकाद्वारे कळवीण्यात आले आहे.

Post Bottom Ad