केबल टाकण्यासीठीची कामे १९ मेपर्यंत पूर्ण करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2017

केबल टाकण्यासीठीची कामे १९ मेपर्यंत पूर्ण करा


मुंबई - विविध नागरी कामांसाठी (युटिलिटी) परिरक्षण कामे, केबल टाकणे किंवा इतर संबंधित कामांसाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे रस्ते, पदपथ इत्यादींवर चर खोदाई करण्याच्या परवानग्या दिल्या जातात. मात्र येत्या पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये, यादृष्टीने सध्या जी कामे सुरू आहेत, ती १९ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. तसेच ज्या कामांबाबत परवानगी देण्यात आली आहे, मात्र अद्यापही कामे सुरू झालेले नाही. त्या परवानग्या स्थगित करण्यात आल्या असून आता त्यांना १ ऑक्टोबर २0१७ पासून कामे सुरू करता येतील. 

रस्ते, पदपथ इत्यादींवर चर खोदाई करण्याबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्यांनुसार सध्या जी कामे सुरू आहेत, ती सर्व कामे येत्या शुक्रवारपर्यंत म्हणजेच १९ मेपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करावे तसेच पदपथही पूर्ववत करण्याचे आदेश विविध नागरी कामे करणार्‍या संस्थांना पालिकेकडून देण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्यांबाबत अद्यापि काम सुरू झाले नसल्यास, अशा सर्व परवानग्या महापालिका प्रशासनाद्वारे ३0 सप्टेंबर २0१७ पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ यापूर्वी परवानगी मिळाली असल्यास, पण अद्यापि काम सुरू झाले नसल्यास, अशी कामे ३0 सप्टेंबर २0१७ नंतरच करावयाची असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

Post Bottom Ad