मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ३४ टक्के मुले कुपोषित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2017

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ३४ टक्के मुले कुपोषित


मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील कुपोषित मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत पालिकेच्या शाळांमधील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण चौपटीपेक्षा जास्त वाढले असून महापालिकेच्या शाळांमध्ये ३४ टक्के मुले कुपोषित असल्याचा धक्कादायक अहवाल 'प्रजा फाऊंडेशन'ने मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहिर केला. 

'प्रजा फाऊंडेशन'ने जाहिर केलेल्या या अहवालानुसार सन २०१३-१४ ते २०१५-१६ या तीन वर्षांमध्ये पालिका शाळेतील कुपोषित मुलांची आकडेवारी या संस्थेने माहिती अधिकारात मिळवली आहे. या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये पालिका शाळांमध्ये ३० हजार ४६१ मुले कुपोषित होती. यात वध होऊन सन २०१५-१६ मध्ये तब्बल एक लाख ३० हजार ६८० मुले कुपोषित असल्याचे अहवालात नोंद आहे. आकड़ेवारीनुसार पालिका शाळेतील ३४ टक्के मुले कुपोषित आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. एम पूर्व वॉर्ड मधील गोवंडी व मानखुर्दमध्ये सन २०१५-१६ मध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण सर्वांत जास्त १५ हजार ३८ एवढे आहे.

मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये एक मोठे संकट निर्माण होत असून, सर्व सरकारी पातळ्यांवर जेथे मुलांच्या पोषणासंबंधी काम केले जाते, त्यांनी हा प्रश्न तातडीने हाताळला पाहिजे, असे 'प्रजा'चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त निताई मेहता यांनी सांगितले. मुंबई पालिकेच्या शाळांतील वाढत्या कुपोषणाच्या पातळीसंदर्भात महापालिकेचा प्रतिसाद हा अत्यंत असमाधानकारक आहे, हे लक्षात घेता पालिकेच्या शाळांत दिल्या जाणार्‍या मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता हे काळजीचे एक कारण असू शकेल, असे'प्रजा'चे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के म्हणाले.

बजट वाढले मात्र निधी खर्च केला नाहीं -
'पालिकेच्या इयत्ता पहिली ते पाचवीसाठी २0१३-१४ च्या अर्थसंकल्पामध्ये अंदाजे २९ कोटी रुपये निधी होता. त्यात वाढ होऊन २0१५-१६ मध्ये ३२ कोटी रुपये झाला तसेच सहावी ते आठवीसाठी अंदाजे ३३ कोटींचा निधी होता, तोदेखील वाढून २0१५-१६ मध्ये ३९ कोटी रुपये झाला. याच काळात निधीचा वापर कमी होऊन पहिली ते पाचवीसाठी तो ८१ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांवर आणि त्याचबरोबर सहावी ते आठवीसाठी ८३ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांवर आला.

एम् पूर्व विभागात कुपोषण जास्त -
एम/पूर्व वॉर्ड, जेथे मुंबईतील सर्वात कमी 'मानव विकास निर्देशांक (एचडीआय) आढळतो, तेथे २0१५-१६ मध्ये कुपोषित मुलांची संख्या जास्तीत जास्त (१५0३८) आहे. एच/पूर्व (सांताक्रुझ) आणि एल (कुर्ला) येथे कुपोषित मुलांचे प्रमाण अनुक्रमे ९,१00 आणि ६,५८६ इतके आहे, अशी माहिती म्हस्के यांनी दिली. गोवंडी आणि मानखुर्द येथे मुंबईतील सर्वात वाईट सामाजिक आणि आर्थिक स्थिती आहे, असे सांगताना, 

कुपोषणात मुलींची टक्केवारी जास्त -
२0१५-१६ मध्ये कुपोषित मुलींची टक्केवारी ३५ टक्के तर मुलांची टक्केवारी ३३ टक्के आहे. २0१४-१५ मध्ये हेच प्रमाण मुलींमध्ये २६ टक्के अणि मुलांमध्ये २७ टक्के होते तसेच २0१३-१४ मध्ये मुलींमध्ये ते ९ टक्के आणि मुलांमध्ये ६ टक्के एवढे होते.

मोठ्या वर्गात कुपोषण जास्त 
कुपोषित मुलांचे प्रमाण लहान वर्गांपेक्षा मोठय़ा वर्गांत वाढले आहे. वर्ष २0१३ ते २0१५-१६ दरम्यान कुपोषित विद्यार्थ्यांचे प्रमाण तीन हजार १२३ वरून १0 हजार ८0२ इतके वाढले आहे. तर पाचवीच्या वर्गातील कुपोषित विद्यार्थी संख्या २५९१ वरून वाढून १0 हजार ५६२ इतकी वाढली आहे. 

Post Bottom Ad