डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Share This


धुळे - मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी एकाच छत्राखाली सर्व सोईसुविधा देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे,महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, डी.एस.अहिरे, समाज कल्याण आयुक्त पीयुषसिंह, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, समाज कल्याण विभागाचे अपर आयुक्त डॉ.सदानंद पाटील, सहाय्यक आयुक्त के.जी.बागुल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुतन इमारतीस भेट देवुन माहिती घेतली. उद्घाटन प्रसंगी बोलतांना बडोले यांनी इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी विविध विभाग एकाच ठिकाणी आल्याने नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. सामाजिक न्याय भवनाची इमारत उभारण्यासाठी 6 कोटी 55लाख एवढा खर्च झाला आहे. या इमारतीत विविध महामंडळांची कार्यालये, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे कार्यालय, म्युझियम , वाचनालय, सभागृह, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आदी विविध कार्यालये आणि सुविधा आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थ येथे भेट देवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages