मुंबई - म्हाडाच्या इमारत दूरूस्ती मंडळाच्या माध्यमातून अतिधोकादायक म्हणून जाहिर केलेल्या इमारतींना नोटीस पाठवूनही जे रहिवासी घरे खाली करीत नाहीत त्यांनी ७ दिवसाची डेडलाईन देण्यात आली असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता व गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी स्पष्ट केले आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी रहिवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून जिवितहानी टाळण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात येतील अशी स्पष्टोक्ती दिली आहे.
म्हाडाच्या इमारत दूरूस्ती व पूनर्रचना मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापासून करण्यात आलेल्या पावसाळपूर्व सर्वेक्षणात ९ इमारती अतिधोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र या ९ पैकी ६ इमारतींचा समावेश मागील वर्षीच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये होता. यंदा मात्र केवळ ३ नव्या इमारतींची भर यात पडली आहे. या ९ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारंतीमध्ये २४७ निवासी + २५३ अनिवासी असे एकणूा ५00 रहिवासी आहेत. या अतिधोकादायक इमारतींपैकी २ इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. १0 निवासी भाडेकरूंनी आपली पर्यायी व्यवस्था केली आहे. तर उर्वरित २१८ भाडेकरूंची सोय संक्रमण शिबीरांमध्ये करावी लागणार आहे. मात्र नोटीस बजावल्यानंतर रहिवाशांनी पर्यायी व्यवस्थेसाठी म्हाडाच्या दूरूस्ती मंडळाकडे य्ेाण्याचे आवाहन केले आहे. ऐन पावसाळयात उपकरप्राप्त जीर्ण इमारतीं कोसळण्याच्या घटना घडतात त्यामुळे रहिवाशांना अनेकदा आपत्तीजन्य परिस्थितीला सामेारे जावे लागते. रहिवाशांचा त्रास कमी व्हावा आणि जीवितहानी व वित्तहानी होउू नये यासाठी म्हाडा दूरूस्ती मंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
२0१७ सर्वेक्षणातील अतिधोकादायक इमारती - १४४, एम जी रोड, एक्सप्लेनेंड मेन्शन
२0८ - २२0 काझी सय्यद स्ट्रिट
५५ - ५७ , नागदेवी क्रॉस लेन
इमारत ४४ - ४६ काझी स्ट्रिट, ९0-९४- १0२ मस्जिद स्ट्रिट
१0१ -१११ बारा इमाम रोड,
१७४ - १९0, १२५ -१३ के एम शर्मा मार्ग
३0 - ३२ , २ री सुतार गल्ली.
इमारत ९, चौपाटी, सी पे स
४६ - ५0 , लकी मेन्शन, क्लेअर रोड