
नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, या हेतूने मुंबईमधील संवेदनशील भागातून अशा प्रकारे हा रूट मार्च (संचलन) काढला जातो. अशाच प्रकारे रविवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला. घाटकोपर पोलीस ठाण्यातून सुरू झालेला हा मार्च अमृत नगर, संघांनी इस्टेट, नित्यानंद नगर, घाटकोपर रेल्वे स्थानक मार्गे संचलन करण्यात आले. या संचलनात अतिशीघ्र कृती दलाचे जवान आणि घाटकोपर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सशस्त्र वाहने आणि साधनांच्या सोबत पोलिसांनी यावेळी शक्ती प्रदर्शन केले. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले. या संचलनामुळे समाजकंटकांमध्ये पोलिसांची भीती आणि जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होते.
