
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या समस्या समजण्यासाठी व् त्यावर उपाय योजना राबवण्यासाठी संपर्क अभियान राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगर पालिकेच्या वार्ड क्रमांक ९६ चे नगरसेवक हाजी हालीम खान यांनी स्थानिक आमदार डॉ. संजय राईमुलकर यांच्या सोबत बुलढाणा जिल्हातील मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
