मुंबई / प्रतिनिधी - नागरिकांना खुल्या जागांमध्ये प्रवेश करण्याचा मूलभूत अधिकार आहे, मुंबईमधील खुल्या जागांची देखभाल करून तेथे नागरिकांना विनाअटकाव प्रवेश देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. हि जबाबदारी महानगरपालिकेने पार पाडावी. राणीबाग हे वनस्पती उद्यान असल्याने या उद्यानाच्या प्रवेशासाठी अवाच्या सव्वा शुल्क लावल्यास नागरिकांच्या प्राणवायूचा वापर करण्यावर शुक्ल लावण्यासारखे होईल यामुळे भायखळा येथील राणीबागेतील २० पट शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी माजी सनदी अधिकारी द म सुखतणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाउंडेशन द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत सुखतणकर बोलत होते. यावेळी बोलताना १८६१ मध्ये नागरिकांच्या शैक्षणिक व मनोरंजनात्मक आस्वादासाठी राणीची बाग हे सार्वजनिक वनस्पती उद्यान स्थापन केले. १८९० साली यात छोट्या प्राणिसंग्रहालयाची सुरुवात करण्यात आली. राणीबागेच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६३ टक्के जागा वनस्पती उद्यानाने तर १८ टक्के जागा प्राणी संग्रहालयाने व्यापली आहे. नागरिक ताज्या व स्वच्छ हवेसाठी आणि विश्रांतीसाठी उद्याने व मोकळ्या जागांना भेटी देतात. तर अधूनमधून प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. उद्यानाला भेटी ड्नेर्यांचे प्रमाण जास्त आहे तर प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या कमी आहे. नियोजन समितीने मुंबईच्या विकास आराखड्यात राणीबागेला वनस्पती उद्यान म्हणून नामनिर्देशन केले आहे तर दुय्यम नामनिर्देशन म्हणून प्राणिसंग्रहालय असे केल्याचे सुखतणकर म्हणाले.
भारतव सरकारच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने ठरविलेल्या माणकाप्रमाणे खुल्या जागा आणि लोकसंख्या यांचे गुणोत्तर १० ते १२ चौरस मीटर इतके असायला हवे असे म्हटले आहे. परंतू मुंबईत हे प्रमाण दर माणसी १.२४ चौरस मीटर इतके आहे. मुंबईच्या जवळील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या उद्यानासाठी २ रुपये तर महाराष्ट्र निसर्ग उद्यानासाठी ५ रुपये नाममात्र शुल्क आकारले जाते. मुंबईतील इतर उद्यानात प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत. राणी बागेचे प्रस्तावित प्रवेश शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवल्यास खुल्या जागेचा उपभोग घेण्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जाईल असे सुखतणकर म्हणाले. यावेळी सुखतणकर यांच्यासह नयना कथपालिया, मेहेर रफात, फाउंडेशनच्या हुतोक्षी रुस्तोमफ्राम, शुभदा निखारगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.