आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणे रेल्वे स्थानकांचा विकास करणार - सुरेश प्रभू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2017

आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणे रेल्वे स्थानकांचा विकास करणार - सुरेश प्रभू

मुंबई - उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱया लाखो मुंबईकरांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालय विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील पाच रेल्वे स्थानके आंतरराष्ट्रीय विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीने विकास करण्याची घोषणा मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. तसेच मुंबईतील विविध स्थानकांमध्ये पुरविण्यात आलेल्या सुविधांचे उद्घाटन नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेमंत्र्यांनी केले. या कार्यक्रमावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, पश्चिम रेल्वे, मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)चे अधिकारी आदी उपस्थित होते.  


अत्याधुनिक स्थानकांमध्ये मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, बोरिवली, अंधेरी या पाच स्थानकांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवरील विविध स्थानकांमध्ये नव्याने पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत बोलताना त्यांनी या पाच स्थानकांच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला. त्याचप्रमाणे राज्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या सहाय्याने नवीन महामंडळही स्थापन करण्याचा पुनरुच्चार केला. चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात थेट प्रक्षेपणाच्या आधारे उद्घाटन करण्यात आले. या पाच स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विमानतळासारखी सुविधा रेल्वे प्रवाशांना मिळेल, त्यात आसनव्यवस्था, आधुनिक तिकीट खिडक्या, आधुनिक आरक्षण केंद्रे आदींचा समावेश होणार आहे.

नवीन सुविधा - बोरिवलीत एलिव्हेटेड डेक, लिफ्ट, नवीन तिकीट आरक्षण कार्यालय, प्लॅटफार्म क्रमांक एकवर लिफ्ट, दक्षिण दिशेला आरक्षण कार्यालय.
रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी दादर, माटुंगा रोड, भाईंदर स्थानकात पादचारी पूल.
दादर, भाईंदर, वसई आणि नालासोपारा स्थानकात सरकते जिने.
बोरिवली, कांदिवली, वसई येथे नवीन तिकीट आरक्षण पेंद्र.
अंधेरीत मेट्रो स्थानकात जाण्यासाठी पादचारी पुलास नव्या स्कॉयवॉकची जोड.
कांदिवली, गोरेगाव स्थानकात स्वच्छतागफह.
नालासोपारा स्थानकात आरक्षण पेंद्र आदींचा समावेश आहे.

Post Bottom Ad