सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

Share This


मुंबई, दि. 18 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांनाService Selection Board (एसएसबी) या परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 1 जून 2017 ते 10 जून 2017 (एकूण 10 दिवस) या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड,नाशिक येथे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर येथे दिनांक 29 मे 2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे.

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे.
अ) कंबाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन
(NDA) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
ब) एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने
एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.
क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.
ड) University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र.0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवरी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages