मुंबई - दिंडोशी विधानसभेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच काही भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने नागरिकांना आमदार सुनिल प्रभु यांनी कुरार मधील दहशत संपविण्याचे आश्वासन कुरारवासियांना दिले होते. तसेच माझे कुरार, निर्भय कुरार ही घोषणा होती. याला असनुसरून प्रभू यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलीस चौकी बांधण्यास मंजुरी मिळाली असून कुरार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लिंबाना व्हनमाने यांच्या हस्ते चौकी बांधण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली.
दिंडोशी विधानसभेतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता तसेच काही भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने, समाज कंटक सर्वसामान्य नागरीकांना मारहाण करणे, त्रास देणे, चोरी करणे, अमली पदार्थांची विक्री, गुंडगीरी अनधिकृत पार्कींग, हप्ता व खंडणी वसुल करून दहशत निर्माण करून समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे येथील रहिवाश्यांमध्ये भितीचे व दहशतीचे वातावरण बनत होते. विधानसभा निवडणूकीच्या वेळी आमदार सुनिल प्रभु यांनी कुरार मधील दहशत संपविण्याचे आश्वासन कुरारवासियांना दिले होते. व माझे कुरार, निर्भय कुरार ही घोषणाही होती. याचा पाठपुरावा करण्यासाठी आमदार सुनिल प्रभु यांनी मुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, डी.सी.पी.यांना पत्र व्यवहार करून गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कुरार पोलिस ठाण्याचे मनुष्यबळ वाढविणे, पोलिसांना पेट्रोलियम बरोबर सी.सी.टी.व्ही कॅमेराने २४ तास पोलिसांच्या दृष्टीक्षेपात आणणे आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस चौक्या उभारणे त्यास मनुष्यबळ उपलब्ध करुन देणे मागील अडीज वर्षात आमदार प्रभु यांनी पोलिस दल व गृह खात्याकडे पाठपुरावा करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम पूर्ण केले.
कुरारगावातील इंदिरा नगर परिसरात रात्रीची वाढती गुन्हेगारी, चो-या - मारामारी इत्यादी दहशतीचे अनेक प्रश्न यामुळे कायदा व सुव्यवस्थे विषयी प्रश्न निर्माण झाले होते. या भागातील नागरीकांनी गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी कायमस्वरुपी पोलिस चौकी उभारावी अशी मागणी केली होती. अनेक वर्ष या पोलिस चौकीस मंजूरी मिळण्यास विलंब होत होता. परंतु आमदार सुनिल प्रभु यांनी पोलिस आयुक्तांबरोबर पत्र व्यवहार करुन सदर मागणीचा पाठपुरावा केला. मंजूरीस विलंब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करुन इंदिरा नगर भागात नव्याने पोलिस चौकी उभारण्यास व कुरार पोलिस ठाण्यास अधिकचे पोलिस बळ देण्यास शासनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी लक्षवेधी द्वारे विधानसभा सभागृहात आश्वासन दिले होते. त्यानूसार पोलिस चौकीसाठी महापालिकेडून जागा उपलब्ध करुन नाहकरत प्रमाणपत्र पोलिस प्रशासनास देण्यात आले परंतु पोलिस चौकी उभारण्यास गृह खात्याच्या अर्थ संकल्पात पुरेसी तरतूद नसल्याने शासनाचा निधी उपलब्ध होण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून सदर काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमदार प्रभु यांनी मंजूरी मिळवली असून सदर चौकीच्या कामाची सुरवात केली आहे. या ठिकाणी चौकी उभारावी म्हणून शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, माजी नगरसेवक, सायली वारिसे, गणपत वारिसे यांनी प्रयत्न केले.
सदर कामाचा शुभारंभ आज दि. २८ मे रोजी कुरार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लिंबाना व्हनमाने यांच्या हस्ते झाले. यावेळी अद्यावत अशी सुविधायुक्त पोलिस चौकीचे काम करुन लवकरात लवकर नागरीकांसाठी खुली केली जाईल असे प्रभु यांनी सांगितले. सदर प्रसंगी नगरसेवक तुळशीराम शिंदे, सुहास वाडकर, विनया सावंत, आत्माराम चाचे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर, प्रशांत कदम, सुनिल गुजर, गणपत वारिसे, उपविभागप्रमुख विष्णू सावंत, विधानसभा संघटक अनघा साळकर, शाखाप्रमुख भाई परब, प्रिदप निकम,संदिप जाधव शाखासंघटक संजीवणी रावराणे,वृंदा पालेकर उपस्थित होते.