राणीबाग शुल्क - भाजपा गटनेते आणि मुंबई अध्यक्षांमध्ये समन्वय नाही - यशवंत जाधव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 May 2017

राणीबाग शुल्क - भाजपा गटनेते आणि मुंबई अध्यक्षांमध्ये समन्वय नाही - यशवंत जाधव


मुंबई ( प्रतिनिधी ) – भायखळा येथील (राणीबाग) जिजामाता उद्यानाच्या प्रवेश शुल्क वाढीवरून शिवसेना भाजपा मध्ये वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. पालिका प्रशासनाकडून आलेल्या शुल्कवाढीच्या प्रस्तावावर गटनेत्यांच्या बैठकीत भाजपा गटनेत्यांकडून मान्यता देत असतानाच त्यांचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या शुल्कवाढीच्या निर्णयाला विरोध करीत असल्याचे चित्र पाहता भाजपाच्या गटनेत्यांमध्ये आणि मुंबई अध्यक्षांमध्ये समन्वय नसल्याची टिका महापालिकेतील सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली आहे. 


जिजामाता उद्यानात पेंग्विन आल्यानंतर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हम्बोल्ट पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत आणला होता , या प्रस्तावावर समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी आई वडिलांसह येणाऱ्या किंवा एका पालकांसह येणाऱ्या किंवा एका पालकांसह येणाऱ्या दोन मुलांना प्रवेश मोफत देऊन पालकांना १०० रुपये शुल्क आकारण्याची सूचना केली , यावेळी कोणत्याही गटनेत्याने हरकत घेतली नसल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. गटनेत्यांच्या बैठकीत भाजपा कडून वेगळी भूमिका मांडली जाते तर प्रसिद्धी माध्यमांसमोर वेगळी भूमिका मांडली जात असून भाजपाकडून केवळ राजकारण केले जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. जिजामाता उद्यानाच्या प्रवेश शुल्कावरून राजकारण करणाऱ्या भाजपाकडून गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, रेल्वे तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. पे टी एम साठी अतिरिक्त शुल्क लावण्यात आले आहे. आधीच महागाईत होरपळणाऱ्या सामान्य लोकांना या भाव वाढीचा त्रास सहन करावा लागत आहे यांची चिंता भाजपाला का नाही वाटत असा प्रश्न उपस्थित करत पालिकेत केवळ सत्ताधारी शिवसेनेला लक्ष करण्यासाठी भाजपाकडून जिजामाता उद्यानाच्या शुल्क वाढीचे राजकारण केले जात आहे असा आरोपही यशवंत जाधव यांनी केला.

Post Bottom Ad