500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर लवकरच माफ होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2017

500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर लवकरच माफ होणार


मुंबई -- मुंबई महापालिका निवडणुकीच्यावेळी ५०० चौरस फुटाच्या घरांवरील कर माफ करण्याचे व ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आले होते. मात्र बजेट मध्ये याबाबत काहीच नोंद करण्यात आली नसल्याने हे आश्वासन आश्वासनच राहिले होते. आता हे आश्वासन प्रत्यक्षात उतरवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सर्व नगरसेवकांची एक बैठक मातोश्री या आपल्या निवासस्थानी घेतली होती. या बैठकीत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी मालमत्ता कर माफ करण्याबाबतची ठरावाची सूचना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना सादर करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसर यशवंत जाधव यांनी महापौरांना तसे पात्र पाठवले आहे. या पत्रावर पुढील कारवाई असुर असून लवकरच याचे प्रस्तावात रूपांतर करून पुढील महिन्यात होणा-या महासभेत ही ठरावची सूचना मंजूरीसाठी येण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार आणि 700 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्‍वासन शिवसेनेने दिले होते. मात्र, या आश्वासनानंतर अद्याप त्यावर अमंलबजावणी झालेली नाही. शिवसेनेच्या या आश्वासनाची भाजपकडून अधूनमधून खिल्लीही उडवली जाते आहे. पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असलेला जकात कर बंद होणार असल्याने जकातीतून मिऴणारे उत्पन्नाची कसर कशी भरून काढायची हा प्रश्न पालिकेसमोर आहे. त्यात मालमत्ता कर माफ व सवलत दिल्यास पालिकेसमोर समस्या निर्माण होणार आहेत. मात्र शिवसेनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करता आली नाही, तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील, याची भीती शिवसेनेनेला आहे. त्यामुळे जीएसटी लागू होण्यापूर्वी या आश्वासनाची अमलबजावणी करण्याबाबतच्या हालचाली शिवसेनेच्या असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तत्काळ हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरसेवकांना दिला. त्यानंतर मंगळवारी 500 चौरस फुटांना मालमत्ता कर माफ करावा व 500 ते 700 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून 60 टक्के सवलत द्यावी अशी ठरावाची सूचना सभागृहात आणावी अशी मागणी जाधव यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत ठरावाची सूचना या महिन्यात पालिका सभागृहात मांडली जाणार असून याच महिन्यात याला मंजूरी मिळण्याची शक्‍यता आहे.

Post Bottom Ad