गिरणी कामगारांना म्हाडाचा ऑनलाईन अर्ज 27 जूनपर्यंत भरता येणार - गृहनिर्माण मंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गिरणी कामगारांना म्हाडाचा ऑनलाईन अर्ज 27 जूनपर्यंत भरता येणार - गृहनिर्माण मंत्री

Share This

मुंबई, दि. 9 June 2017 - म्हाडातर्फे राबविलेल्या मोहिमेदरम्यान ज्या गिरणी कामगारांच्या वारसांना 2010-2011 मध्ये अर्ज करता आले नाही, त्यांना आता 27 जून 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी म्हाडाने उपलब्ध करून दिली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिली आहे.

गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांनी 2010-11 दरम्यान अर्ज केले नसतील, ते आता https://millworker.mhada.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. सदर अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय खर्च म्हणून रूपये 150 ऑनलाईन भरावयाचे आहेत. ज्यांना एटीएम अथवा ऑनलाईन बँकींगद्वारे पैसे भरणे शक्य नाही, अशांसाठी कोटक महिंद्रा बँकेच्या 1) शॉप क्र. 3/10, तळमजला, सिटी व्ह्यु बिल्डींग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी,मुंबई - 18, (2) वीर महल, स.गृ.निर्माण संस्था, तळमजला, शॉप क्र.9/12, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई-10 किंवा (3) हॉलमार्क प्लाझा, तळमजला, गुरूनानक हॉस्पीटल जवळ, कलानगर, वांद्रे पूर्व, मुंबई-51 या शाखेत रोखीने पैसे भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी म्हाडा लॉटरी केंद्र, मित्र कार्यालयाशेजारी गेट नंबर ३, गृहनिर्माण भवन, वांद्रे पुर्व, मुंबई - 51 या कार्यालयास अथवा dycoeastmb@mhada.gov.in येथे संपर्क साधावा.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages