जऱहाड यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) पदाचा पदभार स्वीकारला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2017

जऱहाड यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) पदाचा पदभार स्वीकारला


मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागाचे सचिव आबासाहेब जऱहाड यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली असून जऱहाड यांनी आज (दिनांक ०७.०६.२०१७) सकाळी या पदाचा पदभार स्वीकारला.

जऱहाड हे १९९७ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असून त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी, १९६२ रोजी झाला आहे.त्यांनी 'मास्टर्स इन ऍग्रीकल्चर' ही पदवी संपादन केली आहे. जऱहाड यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमधील कामाचा सुमारे ३० वर्षांचा अनुभव असून त्यांनी नवी मुंबईचे महापालिका आयुक्त, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे उप सचिव, आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन ही पदे समर्थपणे सांभाळली आहेत. सन २०१२ मध्ये ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना जऱहाड यांना 'बेस्ट जिल्हाधिकारी' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये सह मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असताना श्री. जऱहाड यांनी जमीन संपादन करुन राज्यातील औद्योगिक उत्पादन कंपन्यांना वाटप करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. तसेच श्री.जऱहाड यांनी औद्योगिक पायाभूत सुविधांचे परिरक्षण व विकास, औद्योगिक पाणी पुरवठा व समग्र व्यवस्थापन आणि राज्यातील औद्योगिक उद्यानांचा विकास ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली आहे.

जऱहाड यांच्यावर शहर विभागाची तसेच सामान्य प्रशासन, शिक्षण, मालमत्ता, विधी, अनुज्ञापन, दुकाने व आस्थापना, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, मेगासिटी प्रकल्प, अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन, पर्यावरणीय अभियांत्रिकी संदर्भातील विषय, गेट वे ऑफ इंडियाचा विशेष प्रकल्प आदी महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Post Bottom Ad