मुंबईत भायखळा, माटुंगा, गोवंडी, भांडुप, मुलुंड, अंधेरीला स्वाईन फ्लूचा धोका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 June 2017

मुंबईत भायखळा, माटुंगा, गोवंडी, भांडुप, मुलुंड, अंधेरीला स्वाईन फ्लूचा धोका


स्वाईन फ्लूने साढे पाच महिन्यात ७ जणांचा मृत्यू - 
मुंबई / अजेयकुमार जाधव -
राज्यातील स्वाईन फ्लूची जी स्थिती आहे तशीच परिस्थिती भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात आतापर्यंत १३१५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले असून त्यापैकी २४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईत जानेवारी २०१७ ते १५ जून २०१७ या कालावधीत स्वाईन फ्लूचे १७७ रुग्ण आढळले असून त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मुंबईत भायखळा येथील "ई" विभाग, दादर माटुंगा धारावी येथील "जी उत्तर" विभाग, अंधेरी मधील के पूर्व व के पश्चिम विभाग, मानखुर्द गोवंडी येथील "एम पूर्व" विभाग, भांडुपचा "एस" आणि मुलुंडच्या "टी" विभागात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे म्हटले आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये मागील वर्षी (२०१६) १ जून ते १५ जून या कालावधीत डेंग्यूच्या ४८ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी १ जून २०१७ ते १५ जून २०१७ जून या कालावधीत १४ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी जुनच्या पहिल्या १५ दिवसात मलेरियाच्या ४८२ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी १६६ रुग्णांची नोंद झाली आहे. लेप्टोच्या १० रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी ६ रुग्णांची नोंद झाली आहे. गॅस्ट्रोच्या ९७९ रुग्णांची नोंद झाली होती यावर्षी ४३६ रुग्णांची नोंद झाली आहे. हेपेटायसिसच्या रुग्णांची १६६ रुग्णांची नोंद झाली होत्या यावर्षी आता पर्यंत ३४ रुग्णांची नोंद झाली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार १ ते १५ जून २०१७ या कालावधीत १२८ डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण पालिका रुणालयात दाखल झाले होते. २०१५ मध्ये मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे ३०२९ रुग्ण होते त्यापैकी ५२ जणांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये ३ रुग्ण होते त्यापैकी एकही मृत्यू झाला नव्हता. २०१७ मध्ये १७७ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१५ मध्ये मुंबईबाहेरील ५९१ रुग्णांची नोंद होऊन त्यापैकी ६२ जणांचा मृत्यू झाला होता. २०१६ मध्ये स्वाईन फ्लूचा मुंबई बाहेरील एकही रुग्ण आढळून आला नव्हता. २०१७ मध्ये अद्याप मुंबई बाहेरील ३४ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे जानेवारी ते मे २०१७ या कालावधीत १८ तारखेपर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका महिन्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

पालिकेने जाहीर केलेली हि आकडेवारी फक्त महानगर पालिकेच्या रुग्णांची आहे. खाजगी दवाखाने आणि रुग्णालये यामधील आकडेवारीचा यात समावेश नाही. खाजगी दवाखाने आणि रुग्णालये यामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची आकडेवारीचा यात समावेश केल्यास या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आजारांची आकडेवारी
आजार          जून २०१६    १ ते १५ जून २०१७ 
डेंग्यू                    ४८             १४
मलेरिया             ४८२          १६६
लेप्टोस्पायरेसिस  १०              ६
स्वाईन फ्लू            ०           १०७ 
ग्यास्ट्रो              ९७९           ४३६
हेपेटायसिस        १६६             ३४


स्वाईन फ्लू
मुंबईमधील रुग्णांची आकडेवारी
वर्ष        रुग्ण    मृत्यू

२०१५     ३०२९     ५२ 
२०१६           ३       ० 
२०१७        १७७      ७

मुंबई बाहेरील रुग्णांची आकडेवारी 
वर्ष        रुग्ण    मृत्यू 
२०१५     ५९१      ६२ 
२०१६         ०        ० 
२०१७       ३४        ४


मे २०१७  आकडेवारी 
आजार             मे २०१६       मे २०१७ 
ताप                  ४१७१            ४४१५
मलेरिया             ४२३               ३३१
लेप्टोस्पायरेसिस    २                 १०
डेंग्यू                     २७                 ३१
स्वाईन फ्लू             १                 ५०
ग्यास्ट्रो                ९२०              ८४७
हेपेटायसिस         १३५               १०६
चिकनगुनिया          ०                   ०
कॉलरा                     २                  ०

Post Bottom Ad