अमित शहांच्या बॅनर्सवर मुंबई महापालिकेकडून कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अमित शहांच्या बॅनर्सवर मुंबई महापालिकेकडून कारवाई

Share This
मुंबई - केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दौऱ्यावर आले असताना भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून मुंबईत ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स लावले होते. या बॅनर्सवर मुंबई महापालिकेने कारवाई करत सदर बॅनर्स उतरवले आहेत. यातील बहुतेक बॅनर्स शहा यांचा मुक्काम व कार्यक्रमाठिकाणी लावण्यात आले होते. यामुळे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने शहांचे बॅनर्स उतरवून शिवसेनेने भाजपला शह दिल्याची चर्चा मुंबईत रंगली आहे.

मुंबईत अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स लावण्यावर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून अशा बॅनर्सवर कारवाई केली जाते आहे. अमित शहा हे उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत. शहा मुंबईत येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले होते. शुक्रवारी सकाऴपासूनच मुंबई महापालिकेने हे बॅनर्स उतरवण्याची मोहिम आखली. केंद्र व राज्याच्या सत्तेत शिवसेना - भाजपा सत्तेत एकत्र आहेत. मात्र मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेत आहे. मुंबई महापालिकेत या दोन्ही पक्षांत छत्तीसचा आकडा आहे. मुंबईत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवस, कार्यक्रमांनिमित्त अनधिकृतपणे बॅनर्स लावले जातात. यंदाच्या जानेवारी ते मे या पाच महिन्यांत सुमारे साडेतीन हजार बॅनर्स, पोस्टर्स झळकले होते. त्यापैकी 1278 राजकीय पक्षांच्या बॅनर्सचा समावेश होता. महापालिकेने या बॅनर्सवर कारवाई केली. पालिका अशा झळकणा-या बॅनर्सवर नियमित कारवाई करते आहे. शहा यांच्या मुंबई दौ-यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही भेटीचा कार्य़क्रम आहे. शहा आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे सेना -भाजपातील कटुता काहीशी दूर होईल, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र शहा यांचे फलक उतरविण्याचा सपाटा महापालिकेने लावल्यामुळे सेनेचा राग कमी झाला नसल्याचे संकेत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages