
बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम' पश्चिम वॉर्डमधील उद्यान विभागाच्यावतीने विभाग क्र.१५२ च्या स्थानिक नगरसेविका आशा सुभाष मराठे व जेष्ठ नागरिक,लहान मुलांसोबत चेंबुर विभागात विविध ठिकाणी "जागतिक पर्यावरण दिन"साजरा करून पर्यावरणाबाबत विशेष माहिती नागरिकांना दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी उद्यान, सिद्धार्थ कॉलनी, चेंबुर येथे वृक्षांरोपण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी उद्यान बृहन्मुंबई महानगर पालीकेच्या अधिपत्याखाली घेण्यास म्हाडा बरोबर पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहेत.
