जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिंडोशी विधानसभेतील रहेजा संकुलाजवळील महापालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या शीला रहेजा उद्यानामध्ये आमदार, विभाग प्रमुख व मुंबईचे माजी महापौर सुनिल प्रभु यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमास विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष तुळशीराम शिंदे, शाखा प्रमुख संदीप जाधव, उप उद्यान अधीक्षक घुले सहाय्यक उद्यान अधीक्षक गोसावी, यांच्यासह जवळपासच्या परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र वृक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या ताम्हण या झाडाची मोठी रोपे आमदार सुनिल प्रभु तसेच उपस्थितांच्या हस्ते उद्यानात लावण्यात आली, आकर्षक फुले असणाऱ्या व पक्ष्यांच्या आवडत्या ताम्हण या झाडाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे झाड मुंबईच्या वातावरणामध्ये व जमिनीमध्ये जोमाने व कमी पाण्यात वाढते. सोसाट्याचा वारा,मुसळधार पाऊस, अत्यंत दमट हवामान अशा प्रतिकुल वातावरणातही हे झाड सुमारे २५ फुटांपासून ३० फुटापर्यंत वाढू शकते व यावर येणारी जांभळी फुले फारच मनमोहक असता तसेच यावेळी कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळाची रोपे देखील लावण्यात आली.