"बेस्ट"च्या मालमत्तेत पालिकेकडून मोफत धूम्रफवारणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 June 2017

"बेस्ट"च्या मालमत्तेत पालिकेकडून मोफत धूम्रफवारणी


बेस्टचे कोट्यवधी रुपये वाचणार - 
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक खात्यामार्फत सर्वत्र मोफत कीटकनाशक व धूम्रफवारणी करण्यात येते. मात्र बेस्ट उपक्रमाच्या विविध आस्थापनांच्या व मालमत्तेच्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्यात येते त्यासाठी दरवर्षी बेस्ट उपक्रमाला कोट्यवधी रुपये खर्च येतो. मात्र बेस्ट उपक्रमाच्या विविध आस्थापनांमध्ये यापुढे मुंबई महापालिकेद्वारे धूम्रफवारणी मोफत केली जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट उपक्रमाचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत.

मुंबई महापालिकेतर्फे तर्फे झोपडपट्ट्या , इमारती , निवासी संकुले , मैदाने , नदी नाले गटारे , रस्त्यांरस्त्यांवरील चेंबर्स , पाण्याच्या टाक्या , सार्वजनिक ठिकाणी साचलेले पाणी, पाण्याचे तलाव इत्यादी ठिकाणी मोफत कीटकनाशके फवारणी केली जाते. मात्र मुंबई महापालिकेच्यावतीने बेस्ट उपक्रमाच्या रोख भरणा केंद्र, बस स्थानके व वीज संग्रही केंद्रांच्या आवारात प्रत्येक वर्षी मोफत कीटकनाशक फवारणी केली जाते. मात्र विविध बस आगरे, कार्यशाळा व अधिकारी व कर्मचारी वसाहती या ठिकाणांवर कीटकनाशके फवारणी करण्यासाठी पालिका बेस्टकडून पैसे घेते. सन २०१५ - १६ मध्ये धूम्रफवारणी व कीटक नाशके फवारणीसाठी एक कोटी २७ लाख ९७ हजार ८७७ रुपये इतका खर्च आला होता. बेस्ट उपक्रम हा महापालिकेचाच एक उपक्रम असल्याने बेस्ट उपक्रमाची धूम्रफवारणीची रक्कम माफ करावी अशी विनंती बेस्ट उपक्रमाचे तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी पालिका आयुक्तांना केली होती, त्या अनुषंगाने २०१५ - १६ सालासाठी हि सेवा मोफत पुरविण्यासाठी २३ मार्चच्या स्थायी समितीसभेत मंजुरी देण्यात आली. सन २०१६ - १७ सालासाठी हि रक्कम १ कोटी ४० लाख ७७ हजार ६६५ इतकी आहे. बेस्टची सध्याची आर्थिक परिस्तिथी हालाकीची असल्याने व बेस्ट उपक्रम मुंबईकर नागरिकांना अखंड वीजपुरवठा, परिवहन सेवा देत असल्याने यापुढे धूम्रफवारणी करताना बेस्टकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

Post Bottom Ad