मुंबई महापालिकेच्या पेंशनसाठी उपोषण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेच्या पेंशनसाठी उपोषण

Share This

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या भांडुप येथील एस विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या नाना केदारे यांच्या सेवानिवृत्तीनंतर २००८ साली मृत्यू झाला. केदारे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नीला सादर निवृत्ती वेतन देणे गरजेचे असताना केदारे यांना दोन पत्नी आहेत असे कारण देत निवृत्तीवेतन देण्याची फाईल बंद करण्यात आली. केदारे यांच्या निवृत्ती वेतनासाठी मालन नाना केदारे या गेली ८ वर्षे पाठपुरावा करूनही त्यांना निवृत्तीवेतन देंण्यात आलेले नाही. गेले आठ वर्षे निवुर्त्ती वेतनासाठी खेपा मारूनही निवृत्ती वेतन न मिळाल्याने मालन नाना केदारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. म्लान केदारे या उपोषण करणार म्हणून एस विभागाने त्यांच्या निवृत्ती वेतनाची फाईल उपायुक्त सहा यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र या फाईलवर अद्याप काहीही कारवाई झाली नसल्याने तसेच मालन केदारे या गेले एक महिना औरंगाबाद येथील रुग्नालयात उपचार घेत आहेत. यामुळे म्लान यांना पेन्शन मिळावी म्हणून पत्रकार मनोज कोरडे, शीतल कोरडे, कल्पना शाह व दिपेश जाधव यांनी उपोषण केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages