उत्तरप्रदेश येथील सहारनपुर जिल्ह्यातील दलितांची घरे जाळण्यात आली. मध्यप्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या तर महाराष्ट्रात बुलढाणा येथे चर्मकार महिलांची धिंड काढण्यात आली. या तीन घटना विरोधात रिपब्लिकन सेनेने धरणे आंदोलन केले. यावेळी मोदी आणि योगी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी आणि योगी सरकारच्या राजवटीत दलित, शेतकरी आणि महिला सुरक्षित नाही. या अत्याचाराचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध व्यक्त केला. भारतीय लोकशाहीत अश्या प्रकारचे अत्याचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे अत्याचारग्रस्ताना सरकारने त्वरित नुकसान भरपाई त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी आनंदराज यांनी केली.
एकीकडे गरिबांवर अत्याचार होत असतानाच, दुसरीकडे केंद्रसरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात विरोधात आवाज उठवणाऱ्या मीडियाची गळचेपी सुरु आहे. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तभ आहे. मीडियाला स्वतःची मत व्यक्त करण्याचा, सरकार चुकीचे निर्णय घेत असेल अन्याय करीत असेल तर त्या चुका दाखविण्याचा अधिकारी आहे. मीडियाची गळचेपी हि विचार स्वातंत्र्याचा विरोधात आणि लोकशाही साठी घातक असल्याचे हि आंबेडकर म्हणाले. या अन्याय- अत्याचार विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात अहिंसक मार्गाने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आनंदराज यांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार पाहिजे असेही मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं. या धरणे आंदोलनात प्रदेश अध्यक्ष काशिनाथ निकाळजे, भाई सावंत, मुंबई प्रदेश अध्यक्ष रमेश जाधव, संजय पवार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.