मुंबई / प्रतिनिधी - एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) कडून (बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स) बीकेसीत हायब्रीड (विद्युत वातानुकुलित) बस सुरू करण्याचे ठरवले होते. त्यानुसार सॅम्पल हायब्रीड बस गुरुवारी दाखल झाली असून, 5 हायब्रीड बसेस महिन्याभरात बीकेसीत दाखल होणार आहेत. त्यामुळे महिन्याभरात बीकेसीतील रस्त्यांवरून हायब्रीड बसेस धावणार आहेत.
एमएमआरडीएने टाटा मोटर्सकडून 25 हायब्रीड बस खरेदी केल्या आहेत. मार्च 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा खरेदी करार करण्यात आला. एमएमआरडीने या बसची खरेदी केली असली तरी एमएमआरडीए या बसेस चालवण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे देणार आहे. त्यामुळे हायब्रीड बस चालवण्याची आणि बसच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी बेस्टची असणार आहे. गुरुवारी सॅम्पल बस दाखल झाली असून, या बसची तांत्रिक तपासणी केल्यानंतर बस सेवा सुरु करण्यात येईल.