
मुंबई महानगर पालिकेने निवडणुकीपूर्वी केलेल्या प्रभाग रचनेमुळे दादर माटुंगा येथील पारसी कॉलनी दोन विभागात विभागली गेली आहे. यामुळे येथील अर्ध्या रहिवाश्याना आपल्या कामासाठी माटुंगा तर अर्ध्या रहिवाश्याना परेल येथील पालिकेच्या कार्यालयात जावे लागत आहे. असेच या रहिवाश्याना सोयी सुविधा पुरवतानाही अनेक अडचणी येत आहेत. या कारणाने येथील स्थानिक नगरसेवक अँमी घोले यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
