मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वेळेवर मिळत नाहीत अशी तक्रार गेले अनेक वर्षे होती. मात्र गेल्या वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशीच या वस्तूंचे वाटप केले जात आहे. या वर्षीही शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
महापालिकेच्या शाळांमधून पहिल्याच दिवशी शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर, आरोग्य समितीच्या अध्यक्षा रोहिणी कांबळे इत्यादी नगरसेवक व पालिका अधिकारी
गोवंडी लुम्बिनी बाग वॉर्ड नंबर १३९ मधील लोटस कॉलनी नंबर ५ म्युनिसिपल शाळा व गायकवाड नगर येथील शाळेत शालेय वस्तूंचे वाटप करताना नगरसेवक अख्तर कुरेशी व शिक्षक
वॉर्ड नंबर ७८ मधील कोळीवाडा म्युनिसिपल शाळा, हरीनगर म्युनिसिपल शाळा, मेघवाडी म्युनिसिपल शाळा, स्वामी विवेकानंद म्युनिसिपल शाळा येथे शालेय वस्तूंचे वाटप करताना नगरसेविका नाझिया अब्दुल जब्बार सुफी.
कलिना महापालिका शाळेत शालेय उपयोगी वस्तु नगरसेवक सगुण नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या यावेळी सोबत मुख्याध्यापक व शिवसैनिक
कामगार नगर शाळा व शिवसृष्टी शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करताना नगरसेविका
प्रविणा मनिष मोरजकर, सोबत शिवसेना पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी
विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करताना शिवसेना नगरसेविका ऋतुजा हृदयनाथ तारी व कार्यलय प्रमुख बळवंत यादव साहेब, विजय शेलार (उपशाखाप्रमुख ), हृदयनाथ तारी ( उपशाखा प्रमुख ) व युवा सेना उप शाखा अधिकारी अक्षय साळुंखे.