दिंडोशीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2017

दिंडोशीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन


५०० बाटल्या रक्त जमा करण्याचे लक्ष तर महिलांसाठी मोफत योगा प्रशिक्षण शिबीर - आमदार सुनील प्रभू
मुंबई - दिंडोशीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून ५०० बाटल्या रक्त जमा करण्याचे लक्ष तर महिलांसाठी मोफत योगा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार – विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी दिली.

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची शिकवण तमाम शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी दिली होती. तीच शिकवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेटाने चालवत आहेत. मुंबईत रक्ताची आणि प्लेटलेट्सची तीव्र टंचाई भासत आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने दिंडोशी विधानसभा मतदार संघात येत्या रविवार १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मालाड पूर्व कुरारगाव येथील पारेखनगर येथील महापालिका शाळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशीत शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने करणार आहे तरी या या सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून दिंडोशीतील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्रभू यांनी केले आहे.

महिलांसाठी मोफत योगा मार्गदर्शन शिबीर -
दिंडोशी विधानसभा महिला आघाडीच्या वतीने रविवार २५ जून रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुरारगाव पारेखनगर येथील महापालिका शाळेत महिलांसाठी मोफत योगा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.घराचा डोलारा यशस्वी पणे सांभाळणाऱ्या दिंडोशीतील तमाम महिला वर्गाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली. तसेच रविवार २५ जून रोजी सायंकाळी ७ ते ९ आमदार सुनील प्रभू यांच्या कुरार येथील जनसंपर्क कार्यालयात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व जेष्ठ नागरिक कार्ड अशा विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दिंडोशीतील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या विविध शिवसेना शाखांशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रभू यांनी केले आहे.

दिंडोशीत शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन यशस्वीपणे साजरा करण्यासाठी आयोजक आमदार प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विभागसंघटक साधना माने यांच्यासह उपविभागप्रमुख विष्णू सावंत, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, महिला विधानसभा संघटक अनघा साळकर, महिला उपविभाग संघटक रिना सुर्वे व पूजा चौहान, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर व निरीक्षक अंकित प्रभू, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) तुळशीराम शिंदे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर, गणपत वरिसे, सदाशिव पाटील, प्रियवंदा कदम, माजी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, माजी नगरसेवक सुनील गुजर, मनीषा पाटील, सायली वरिसे, यांच्यासह दिंडोशीतील शाखाप्रमुख महिला शाखासंघटक, युवासेना व विद्यार्थीसेना तसेच सर्व शिवसैनिक भरपूर मेहनत घेत आहेत.

Post Bottom Ad