खाजगी शाळांची दादागिरी संपली पाहिजेत – संजय निरुपम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2017

खाजगी शाळांची दादागिरी संपली पाहिजेत – संजय निरुपम


मुंबई - मुंबईतील ज्या खाजगी शाळा आहेत. त्यांनी केलेल्या भरमसाठ आणि मनमानी फीवाढी मुळे या शाळेतील मुलांचा पालकवर्ग अतिशय त्रस्त झाला आहे. या शाळा पालकांना ही वाढीव फी भरण्याबाबत दबाव टाकत आहेत. या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली या पालकवर्गाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटले आणि त्यांना याबाबत एक निवेदन दिले. 

याबद्दल अधिक माहिती देताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, आम्ही आज पालकवर्गाचे एक शिष्टमंडळ घेवून माननीय राज्यपालांना भेटलो आणि त्यांना एक एक निवेदन दिले आहे की महाराष्ट्रामध्ये फीवाढीच्या बद्दल जो कायदा आहे, त्या कायद्याच्या विरोधात जाऊन खाजगी शाळा दरवर्षी अवास्तव फीवाढ करत आहेत. प्रत्येक वर्षी या शाळा ही फीवाढ करू शकत नाहीत असा कायदा आहे. तरीही ही फीवाढ केली जाते आणि १५% पेक्षा जास्त केली जाते. जे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात आहे. आम्ही राज्यपालांकडे निवेदन केले की ही फी वाढ परत घेतली पाहिजे. यासाठी त्यांनी शासनावर दबाव टाकावा आणि त्यांच्याशी बोलावे. कारण महाराष्ट्र शासनात जे लोक बसले आहेत. त्यांनी पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. पालकांना होणाऱ्या त्रासाकडे ते लक्ष देत नाहीत आणि माननीय राज्यपाल साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की, ते या दोन दिवसांत सर्व अधिकारी वर्गाला बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि योग्य तो निर्णय घेणार आहेत.

सदर भेटीदरम्यान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत दहिसर येथील युनिव्हर्सल हाय स्कूलच्या पालकवर्गाच्या शिष्टमंडळातून साक्षी डहाणूकर, सुमन शेट्टी, गुरुनाथ पाटकर, निरव शाह, रुपाली शानभाग, प्रशांत जोशी, नेहा पटेल, पूजा परमार, स्नेहल पटेल व इतर पालक उपस्थित होते.

Post Bottom Ad