
शिवसेना शाखा क्रमांक २०३ च्या विद्यमाने नगरसेविका सिंधु मसुरकर यांच्या प्रयत्नाने महिला उद्योजिकता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी डे टू डे मार्केटिंगच्या पूर्णिमा शिरीषकर, लक्ष फाउंडेशनच्या सोनाली बने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्याला स्थानिक महिला व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
