“उघड्यावर शौचविधीपासून स्वातंत्र्य मिळवूया" - 9 ते 15 ऑगस्ट जनजागृती सप्ताह - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

“उघड्यावर शौचविधीपासून स्वातंत्र्य मिळवूया" - 9 ते 15 ऑगस्ट जनजागृती सप्ताह

Share This

मुंबई, दि.14: हागणदारीमुक्तीकडे महाराष्ट्राने यशस्वी वाटचाल केली आहे. हागणदारी मुक्ती संदर्भात अधिक व्यापक जनजागृती करण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट क्रांतिदिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन या “उघड्यावर शौचविधीपासून स्वातंत्र्य” या जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

मंत्री लोणीकर यांनी सांगितले, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 9 ते15 ऑगस्ट या संपूर्ण सप्ताहा दरम्यान,“खुले मे शौचसे आझादी” ही हागणदारीमुक्तीसाठी मोठी मोहीम सर्वत्र राबवावी असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही त्यादरम्यान, हा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सध्या हागणदारीमुक्त राज्यांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा हा परिणाम असून लवकरच महाराष्ट्र पूर्णत: हागणदारी मुक्त होणार आहे. जनजागृती अधिक व्यापक स्वरूपात व्हावी, यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात रॅली, मानवी साखळी, विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. उघड्यावर शौच टाळून शौचालयांचा वापर करण्यासाठी ग्रामस्थ, नागरिकांना प्रेरीत केले जाणार आहे. संपूर्ण राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक पातळ्यांवरही ख्यातनाम व्यक्तींना या मोहीमेत सहभागी करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री लोणीकर यांनी केले आहे.

11 जिल्हे हागणदारीमुक्त - 
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले असून यातून आतापर्यंत 11 जिल्हे, 156तालुके, 17 हजार 74 ग्रामपंचायती आणि 24 हजार 501 गावे हागणदारी मुक्त झाले आहेत. मागील एका वर्षात राज्यात20 लाख शौचालये बांधण्यात आली असून हा एक विक्रम आहे. मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त होईल, असा विश्वास मंत्री श्री . लोणीकर यांनी व्यक्त केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages