बेस्टची संपाकडे वाटचाल -
मुंबई / प्रतिनिधी - बेस्टची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने बेस्टला पालिकेने आर्थिक मदत करावी म्हणून महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाचवी बैठकही निष्फळ ठरली आहे. बेस्टला दिलासा देण्यास पालिकेला अपयश येत असल्याने मंगळवार १ ऑगस्टपासून बेस्टच्या वडाळा डेपो समोर कामगार संघटनांचे प्रतिनिधी व कर्मचारी बेमुदत उपोषण सुरु करणार असल्याची माहिती बेस्ट कर्मचारी कृती समितीचे शशांक राव यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान बेस्टबाबत १० ऑगस्टला पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरु असल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करू नये असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिकेची परिवहन सेवा असलेल्या बेस्टला आर्थिक संकटातून जावे लागत आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टला दोन हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे. बेस्टला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी पाच बैठका झाल्या आहेत. सुरुवातील पालिका आयुक्तांकडून बेस्टला कृती आरखडा देण्यात आला होता. हा कृती आरखडा कर्मचाऱ्यांना मारक असल्याने त्याला विरोध करत रद्द करण्यात आला आहे. २४ जुलैला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत बेस्ट महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या आर्थिक स्थितीचे सादरीकरण केले होते. या सादरीकरणानंतर बेस्टच्या तिकिटांच्या दरामध्ये बदल, बेस्टच्या रूटमध्ये सुसूत्रता आणणे, जास्त प्रवासी असलेल्या ठिकाणी जास्त बस गाड्या तर कमी प्रवासी असलेल्या ठिकाणी कमी बस गाड्या चालवणे, बेस्ट कर्मचाऱ्यांचे भत्ते पालिका कर्मचाऱ्यांइतके करणे, बेस्टमध्ये नव्याने भरती न करता आहे त्याच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे अश्या सूचना आयुक्तांनी करत अतिरिक्त आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापक यांनी एकत्र बसून नव्याने कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या बैठकीनंतर ३१ जुलैला अंतिम बैठक होईल असे जाहिर करण्यात आले होते.
आज बेस्टबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी सादरीकरण केले मात्र त्यात कर्मचारी बचाव भूमिका नसल्याने बैठकीत काहीच निणर्य झालेला नाही, यामुळे बेस्टची बैठक निष्फळ ठरली. बेस्ट कर्मचारी हा महापालिकेचाच कर्मचारी आहे तरीही या कर्मचाऱ्याकडे व बेस्टला वाचवण्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याने बेस्ट यूनियन सकाळी ९ वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात करणार आहे असे शशांक राव यांनी सांगितले. तर बेस्टबाबत नवा आराखडा सादर करण्यात आला. आजच्या बैठकीतही कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नसल्याने पालिकेला बेस्टला आर्थिक मदत करायची नाही हे दिसत आहे. तरीही पालिका बेस्टला मदत करणार आहे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे बेस्ट कर्मचारी आणि संघटना १ ऑगस्टपासून करत आहेत. या उपोषणामुळे किंवा एखाद्या वेळी संप झाला आणि मुंबईकर नागरिकांना त्याचा त्रास झाल्यास याला सर्वस्वी सत्ताधारी शिवसेना आणि पालिका जबाबदार असेल असे पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपोषण करू नये - महापौर
बेस्टबाबतच्या आजच्या बैठकीत तोडगा निघालेला नाही. बेस्ट व्यवस्थापक आणि आयुक्त यांनी एकत्र बसून तोडगा काढावा असे आदेश देण्यात आले आहेत. कायमस्वरूपी कितपत नियोजन करायचे याबाबत आयुक्त धोरण आखणार आहेत. मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बेस्टचे बजेट अंतर्भूत करावे अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.10 ऑगस्टला पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषण करू नये.
विश्वनाथ महाडेश्वर - महापौर