पालिकेतील निर्णयावर नागरिकांच्या सूचना व आक्षेप मागवा - समाजवादी पक्ष - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेतील निर्णयावर नागरिकांच्या सूचना व आक्षेप मागवा - समाजवादी पक्ष

Share This
मुंबई / प्रतिनिधी - 
मुंबई महानगरपालिके निवडणुकी दरम्यान शिवसेना आणि भाजपा यांनी एकमेकांवर केलेल्या गलिच्छ आरोपांमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. निवडणुकीपूर्वी एकत्र असणारे शिवसेना व भाजपा निवडणुकीनंतर विरोधात आले आहेत. यामुळे महापालिकेत होणाऱ्या सभांमधून घेण्यात आलेले निर्णय पालिकेच्या संकेतस्थळावरवर प्रदर्शित करावेत व या निर्णयावर नागरिकांकडून सूचना व आक्षेप मागवण्यात यावेत अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. तसा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान पारदर्शकतेबाबत भाजपा व शिवसेनेने गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. निवडणुकी दरम्यानच्या गलिच्छ राजकारणामुळे महापालिकेच्या नावाची बदनामी झाली आहे. यामुळे महापालिका सभा, विशेष व वैधानिक समित्यांच्या सभेची कार्यक्रम पत्रिका, त्यावर घेण्यात आलेले निर्णय महापालिकेच्या संकेतस्थळावर नियमित प्रदर्शित करण्यात यावेत. तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयावर नागरिकांच्या सूचना व आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलबध करून द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. स्थायी समितीत घेण्यात येणाऱ्या निर्णयावर जास्त प्रमाणात आक्षेप नोंदविण्यात येत असल्याने स्थायी समितीत घेतलेल्या निर्णयाबाबत हि सुविधा सर्वप्रथम सुरु करावी. नंतर इतर समित्यांनाही हि सुविधा काही कालावधीने सुरु करावी, नागरिकांकडून सूचना व आक्षेप मागवण्याची सुविधा तातडीने लागू करण्याची मागणी रईस शेख यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages