
मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर रमाबाई नगरमध्ये जॉयमॅक्स या इंग्रजी माध्यमातील शाळेतील २ विद्यार्थीनी डोक्यात नारळ पडल्याने जखमी झाले आहेत. आज सकाळी शाळा सुरू असताना ही घटना घडली. राजावाडी रुग्णालयात उपचार केल्यानंतर या दोन्ही विद्यार्थीनीना घरी सोडण्यात आले.
घाटकोपर येथील रमाबाई नगरमध्ये जॉयमॅक्स शाळेच्या छतावर नारळाचे झाड आहे. त्यावरून नारळ पडून २ विद्यार्थी जखमी झाले. फराह सलीम सय्यद (५) आणि प्रणाली अनिल मोरे (५) अशी या दोन सिनियर केजीच्या विद्यार्थीनींची नावे आहेत. दोघींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शाळा सुरू असताना घडली. या दोन्ही मुली वर्गात बसलेल्या होत्या. सुदैवाने त्या दोघीही थोडक्यात बचावल्या. गेल्या आठवड्यात चेंबूरमध्ये नारळाचे झाड पडून एक महिला मृत्युमुखी पडली होती. त्यानंतर ठाण्यात एका वकिलाचा झाड अंगावर कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.