पाेलिस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत शुक्रवारी धरणे अांदाेलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2017

पाेलिस पाटलांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत शुक्रवारी धरणे अांदाेलन

मुंबई / प्रतिनिधी - अपुऱ्या संख्याबळामुळे पाेलिस पाटलांवरील कामाचा ताण वाढत अाहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाेलिस पाटलांची रिक्त पदे त्वरीत भरावीत तसेच त्यांच्या मानधनात वाढ करावी या मागणीसाठी पाेलस पाटिल कल्याणकारी संघाच्या वतीने शुक्रवारी मुंबईच्या अाझाद मैदानावर धरणे अांदाेलन केले जाणार अाहे. रिक्त पदांची भरती, मानधनात वाढ याबराेबरच सेवानिवृत्तीनंतर पाेलिस पाटलांना निवृत्तीवेतन, पाेलिस कल्याण निधी तयार करणे, प्रवास भत्ता, प्रत्येक गावात पाेलिस पाटलांसाठी कार्यालयाची जागा अादी विविध मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत अांदाेलन छेडण्याचा इशारा देण्यात आला अाहे.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना, राज्यात एकूण ४७ हजार पाेलिस पाटलांची पदे असून त्यापैकी सध्या फक्त २७ हजार पोलीस पाटील कार्यरत अाहे. जवळपास २० हजार पदे रिक्त असल्याने पाेलिस पाटिलांवरील कामाचा ताण वाढत अाहे. पदे भरण्यासाठी अनेक जाहिराती निघाल्या अाणि परिक्षाही झाल्या. परंतु रिक्त पदांचा प्रश्न अजुनही प्रलंबित असल्याचे विदर्भ पाेलिस पाटील कल्याणकारी संघाचे अध्यक्ष दीपक पालीवाल यांनी सांगितले. अपुऱ्या कर्मचारी संख्याबळामुळे सध्या एका पाेलिस पाटलाला दाेन ते तीन गावांची जबाबदारी सांभाळावी लागत अाहे. परंतु मानधन मात्र एका गावचेच मिळते. पाेलिस पाटलांवरीलकामाचा ताण कमी करण्यासाठी शासनाने ही पदे त्वरित भरावीत अशी मागरी पालीवाल यांनी केली.

पाेलिस पाटलांना २०१२ मध्ये दरमहा तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. परंतु त्यानंतर अद्याप त्यांच्या मानधनात काेणतीही वाढ करण्यात अालेली नाही. महागाईत सातत्याने वाढ हाेत असताना पाेलिस पाटील म्हणून कर्तव्य बजावणाऱ्यांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत अाहे. पाेलिस पाटलांना दरमहा किमान दहा हजार रुपये मानधन मिळावे अशी मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात अाली अाहे. २०१४ मध्ये संघटनेच्यावतीने पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यात घेण्यात अाले त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वराज चव्हाण यांनी या कार्यक्रमात मानधनात साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल असे सांगण्यात अाले. परंतु अद्यापही हि मानधन वाढ झाली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात अाली.

Post Bottom Ad