पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघाल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला अटक

Share This
मुंबई - पश्चिम रेल्वेवर एका तरुणीला बघून एक तरुण असतील चाळे करत असल्याचा प्रकार ताजा असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २९ जून रोजी पहाटेच्या सुमारास सुटणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्ये एक तरुण एका तरुणीकडे पाहत अश्लील चाळे करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या दोन्ही घटनेत रेल्वे पोलिसांनी दुर्लख केल्याचा प्रकार उघड झाल्याने पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहेत कि बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना वाचवण्यासाठी आहेत असा प्रश्न महिला प्रवाश्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर रेल्वे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघू लागल्याने अश्लील चाळे करणाऱ्या अशोक प्रधान यास तब्बल १३ दिवसानंतर जागे झालेल्या पोलिसांनी बुधवारी कर्नाक बंदर येथून अटक केली आहे.

सीएसएमटी येथे पहाटे सुटणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमधून नाशिक येथे जाण्यासाठी एक तरुणी २९ जून रोजी पहाटे ५.३० वा. आली होती. प्लॅटफॉर्म क्रमांक १३ येथे उभ्या असलेल्या गाडीतील एका डब्यात आरोपीने तिला पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यावेळी, ​घाबरलेल्या तरुणीने जागा बदलली. पण, पहाटेच्या सुमारास अंधार असल्याचा व गर्दी नसल्याचा गैरफायदा घेत तरुणाने कृत्य सुरूच ठेवले. पोलिसांना प्रत्येक प्रकरणात पुरावा हवा असतो यामुळे या तरुणीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि स्थानकावर ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसाकडे तक्रार केली. मात्र या पोलिसाने तरुणीला मदत करण्याऐवजी दुरुत्तरे केली आणि तरुणावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याचवेळी या तरुणीस तिथून निघून जाण्यास सांगितले. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मदत न केल्याचे उघड झाल्याने रेल्वे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघू लागल्यावर पोलिसांनी लाजेखातर आरोपीस बुधवारी अटक केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages