
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी रुपये पाच कोटींचा धनादेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज विधानभवन येथे सुपूर्द केला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल उपस्थित होते.