सरकारकने महापालिकेची चार हजार कोटींची थकबाकी त्वरित द्यावी - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2017

सरकारकने महापालिकेची चार हजार कोटींची थकबाकी त्वरित द्यावी - महापौर


मुंबई - मुंबई महानगरपालिकेला जीएसटीमुळे होणारी नुकसान भरपाई राज्य सरकारकडून केली जात असताना महापालिकेची राज्य सरकारकडे थकबाकी असलेले चार हजार कोटी रुपये पालिका परत करावेत अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेची तब्बल ३८८१ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम राज्य सरकारच्या विविध विभागांकडे थकीत आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभागाकडे २७९४ कोटी २९ लाख, सार्वजनिक आरोग्य विभागाकडे १३६ कोटी १६ लाख, नगर विकास विभागाकडे ५०१ कोटी ७ लाख, पाटबंधारे विभागाकडे १९ कोटी २८ लाख रुपये यांचा समावेश आहे. यामुळे करदात्या मुंबईकरांसाठी नागरी प्रकल्प राबवताना आर्थिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने प्रलंबित असलेली रक्कम तातडीने महापालिकेला द्यावी, अशी मागणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि नागरी सुविधांसाठी आर्थिक तरतूद करताना महापालिकेच्या महसूल स्रोतांबरोबरच राज्य सरकारच्या विविध शासकीय कार्यालयांकडून मिळणारा कर आणि अनुदान गृहित धरून नियोजन करावे लागते. मात्र राज्य शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून हजारो कोटींची रक्कम थकीत आहे. यामुळे मुंबईकरांना सुविधा पुरवताना आर्थिक अडचणी येत असल्याचे महापौर प्रिं. महाडेश्वर यांनी म्हटले आहे. ही थकीत रक्कम मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे महापालिकेतर्पेâ पाठपुरावा सुरू आहे. मात्र ही रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे थकीत रक्कम तातडीने अदा करावी यासाठी महापौर महाडेश्वर यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र दिले आहे.

Post Bottom Ad