शुद्ध पाण्यासाठी पश्चिम रेल्वेवर २० वॉटर वेन्डिंग मशिन्स लावल्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शुद्ध पाण्यासाठी पश्चिम रेल्वेवर २० वॉटर वेन्डिंग मशिन्स लावल्या

Share This

लवकरच आणखी ३७ स्थानकांवर मशिन्स लावण्यात येणार -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या रेल्वेमधून दरदिवशी ७५ लाख प्रवाशी प्रवास करत असतात. मुंबईत अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होत असतात. प्रवाश्याना अशुद्ध पाण्यामुळे आजार होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शुद्ध पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वेवर एकूण १६१ मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी मुंबईमधील पश्चिम रेलेवरील मरिन्स लाईन्स पासून डहाणू पर्यंत २० वॉटर वेन्डिंग मशिन्स लावण्यात आल्या आहेत. लवकरच आणखी ३७ मशिन्स लावण्यात येणार आहेत अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.

मुंबईमधील रेल्वेवरील स्थानकांवर प्रवाश्याना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आईआरसीटीसी द्वारे वॉटर वेंडिंग मशीनस लावण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेवर ३२१ मशिन्सची परवानगी मिळाली त्यापैकी १६६ मशिन्स प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६१ मशिन्स विविध स्थानकावर लावण्यात आल्या आहेत. बोरीवली, दहिसर, माहिम, एलफिन्स्टन रोड,महालक्ष्मी, नायगाँव, दहानू रोड, माटुंगा रोड, सफाले आणि केलवे रोड स्टेशवर एका बाजूस तर चर्नी रोड, खार रोड, लोअर परेल, पालघर आणि मरीन लाइन्स स्टेशनावर दोन वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात आल्या आहेत. लवकरच माहिम, नायगाव, सफाले, वानगाव,केलवे, वैतरणा, अंधेरी, दादर, विरार, नालासोपारा, भाईंदर, वसई रोड, मालाड, कांदिवली,गोरेगाव, चर्चगेट, बांद्रा, मीरा रोड, सांताक्रुज, जोगेश्वरी, विलेपार्ले, ग्रांट रोड आणि बोईसर स्टेशनवर आणखी ३७ वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात येणार आहेत. या व्हेंडिंग मशिन्स द्वारे पाणी भरता येईल किंवा कंटेनर मध्ये प्राप्त केले जाऊ शकते असे भाकर यांनी सांगितले.

या व्हेंडिंग मशिनमधून ३०० मिली लीटर पाणी १ रुपयात भरात येऊ शकते तर कंटेनरमधील पाणी २ रुपयात उपलब्ध होणार आहे, ५०० मिली लीटर पाणी ३ रुपयात भरात येऊ शकते तर कंटेनरमधील पाणी ५ रुपयात उपलब्ध होणार आहे, एक लीटर पाणी ५ रुपयात भरात येऊ शकते तर कंटेनरमधील पाणी ८ रुपयात उपलब्ध होणार आहे, २ लीटर पाणी ८ रुपयात भरात येऊ शकते तर कंटेनरमधील पाणी १२ रुपयात उपलब्ध होणार आहे, ५ लीटर पाणी २० रुपयात भरात येऊ शकते तर कंटेनरमधील पाणी २५ रुपयात उपलब्ध होणार आहे. या व्हेंडिंग मशिन्समुळे प्रवाश्याना पाणी बाटलीमध्ये घेण्याची आवश्यकता भासणार नसल्याची माहिती रविंद्र भाकर यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages