भाजपच्या खासदार, आमदाराकडून माजी सैनिकाचे घर लाटण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2017

भाजपच्या खासदार, आमदाराकडून माजी सैनिकाचे घर लाटण्याचा प्रयत्न


मुंबई / प्रतिनिधी -
भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरी माजी उपमहापौर मोहन मिठबावकर यांच्याकडून माझ्यावर अनेक वेळा दबाव आणला जात आहे. मात्र मी या राजकीय पुढाऱ्यांचे ऐकत नसल्याने माझे घर महापालिकेकडून तोडण्यात आले असा आरोप माजी सैनिक असलेल्या होसेदार साहेर यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत साहेर यांनी हा आरोप केला आहे.

होसेदार साहेर यांनी १९७१ च्या युद्धात भाग घेतला आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांना ६ पदके मिळाली आहेत. मात्र अश्या या माजी सैनिकाचे घर सध्या हडपण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. स्थानिक गुंड, बिल्डर लॉबी, महापालिका अधिकारी आणि राजकीय व्यक्ती यांच्या संगनमताने बोरिवली गणमूर्ती हाऊसिंग सोसायटीमधील घर बळकावण्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती साहेर यांनी दिली. देसाई व शिंगटे यांच्या माध्यमातून भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरी माजी उपमहापौर मोहन मिठबावकर हे धमकी देत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी साहेर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Post Bottom Ad