पालिकेच्या कारवाई विरोधात चर्मकार महासंघाचा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2017

पालिकेच्या कारवाई विरोधात चर्मकार महासंघाचा मोर्चा


मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईत गेले कित्तेक वर्षे गटई कामगार फुटपाथवर व भेटेल त्या जागेवर आपला व्यवसाय करत आहे. मुंबई महापालिकेने अश्या गटई कामगारांवर कठोर कारवाई सुरु केली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघ या संघटनेच्या वतीने माजी समाज कल्याण मंत्री बबनराव ग्लोब यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला.

यावेळी गटई चर्मकाराला पालिकेची सूचना मराठीमधून मिळावी, अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या गटई कामगाराला पालिकेने विशेष घटक म्हणून परवाने द्यावेत, पीच परवान्यांचे स्टॉलमध्ये रूपांतर करावे, थकीत भाडे नियमित करून आकारण्यात आलेला दंड माफ करावा, पीच स्टॉल धारकांना वीज जोडणीस परवानगी द्यावी, पीच स्टॉल परवाना धारकांचा मृत्यू नंतर त्याच्या नात्याऐवजी कटुंबातील एका व्यक्तीच्या नावे परवाना करण्यात यावा, रद्द झालेले परवाने पुनर्जीवित करावेत, राज्य सरकारने दिलेल्या स्टॉलला मासिक भाडे ठरवावे, महापालिकेच्या व्यापारी संकुलात चर्मकाराला आरक्षण मिळावे इत्यादी मागण्यासाठी मोर्चाचे काढण्यात आल्याची महती मुंबई अध्यक्ष राजू नेटके यांनी दिली. या मोर्चात पंढरीनाथ पवार, सरोज बिसुरे, उमाकांत डोईफोडे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान मागण्यांचे निवेदन मुंबईचे महापौर व पालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे नेटके यांनी सांगितले.

Post Bottom Ad