मुंबई महापालिकेची ५९१ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 August 2017

मुंबई महापालिकेची ५९१ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई


मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्‍या आदेशानुसार उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३१ जुलै, २०१७ रोजी अतिक्रमण निर्मूलन पथकांनी उप अनुज्ञापन अधीक्षक (पश्चिम उपनगरे) प्रकाश जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर आणि उपनगरातील तब्बल ५९१ फेरीवाल्यांवर व अनधिकृतरित्या खाद्यपदार्थ बनविणा-या विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार ए, बी, सी, डी व ई विभागातील एकूण २०३ अनधिकृत फेरीवाल्‍यांविरुद्ध सदर कारवाई करण्‍यात आली. यात ४७ चारचाकी हातगाड्या, ८२ सिलेंडर्स आणि इतर ७४ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला. उप अनुज्ञापन अधीक्षक (प्रभारी) सुनील फणसे यांच्‍या नेतृत्वाखाली एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण, जी/उत्तर विभागातील ७० अनधिकृत फेरीवाले / विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यात २७ चारचाकी हातगाड्या, २० सिलेंडर्स आणि इतर २९ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला. उप अनुज्ञापन अधीक्षक (शहर) निला वि. पतंगे यांच्‍या नेतृत्वाखाली पी/उत्तर, के/पश्चिम व पी/दक्षिण विभागातील ४७ अनधिकृत फेरीवाले / विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यात १८ चारचाकी हातगाड्या, १० सिलेंडर्स आणि इतर १९ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला. अनुज्ञापन अधीक्षक शरद बांडे यांच्‍या नेतृत्वाखाली एच/पूर्व, एच/पश्चिम आणि के/पूर्व विभागातील ९९ अनधिकृत फेरीवाले / विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यात २१ चारचाकी हातगाड्या, २६ सिलेंडर्स आणि इतर ५२ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला. वरिष्‍ठ निरिक्षक (अनुज्ञापन) नुतन जाधव यांच्‍या नेतृत्वाखाली आर/मध्‍य, आर/उत्तर आणि आर/दक्षिण विभागातील ७२ अनधिकृत फेरीवाल्‍यांविरुद्ध करण्‍यात आली. यात १३ चारचाकी हातगाड्या, १५ सिलेंडर्स आणि इतर ४४ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला. सहायक अनुज्ञापन अधीक्षक दिलीप राव यांच्‍या नेतृत्वाखाली ४६ अनधिकृत फेरीवाले / विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यात ४ चारचाकी हातगाड्या, १७ सिलेंडर्स आणि इतर २५ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला. तर सह अनुज्ञापन अधीक्षक सिद्धार्थ बनसोडे यांच्‍या नेतृत्वाखाली ५४ अनधिकृत फेरीवाले / विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. यात १३ चारचाकी हातगाड्या, १२ सिलेंडर्स आणि इतर २९ अनधिकृत माल जप्‍त करण्‍यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS