माहीम स्थानकाजवळ लोकलचे 6 डबे घसरले, 6 प्रवासी जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माहीम स्थानकाजवळ लोकलचे 6 डबे घसरले, 6 प्रवासी जखमी

Share This
मुंबई । प्रतिनिधी
शुक्रवारी सकाळी सीएसटीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले. या दुर्घटनेत सहा प्रवासी जखमी झाले आहेत. 

सीएसटीहून अंधेरीच्या दिशेनं जाणारी लोकल ५ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येणार होती, त्यासाठी ७ नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रॅकवरुन ५ नंबरच्या ट्रॅकवर जाताना लोकलचे सहा डबे रुळांवरून खाली घसरले. हार्बर व पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या माहीम स्थानकाजवळ ही घटना घडली. या दुर्घटनेत सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांवर महापालिकेच्या सायन रुग्णालयात उपचार करून दुपार नंतर सोडून देण्यात आले आहे. या सर्वाना मुकामार लागला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. माहीम येथे झालेल्या दुर्घटनेमुळे अंधेरीहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages