​ बीपीएल उत्पन्नमर्यादा वाढविण्यात यावी - नवाब मलिक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

​ बीपीएल उत्पन्नमर्यादा वाढविण्यात यावी - नवाब मलिक

Share This
मुंबई । प्रतिनिधी - 
ओबीस‌ी प्रवर्गासाठी क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाखावरुन आठ लाख रुपये करण्यात आली, त्याच धर्तीवर राज्यातील विविध प्रकारच्या रेशनकार्डसाठी उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. एपीएल म्हणजे केशरी कार्डधारकासाठी असलेली एक लाखाची मर्यादा दोन लाख रु. करण्यात यावी, तसेच प्राधान्य गटासाठी पिवळे कार्डधारकासाठी ग्रामीण भागात ४४ हजार रु. तर शहरी भागात ५९ हजारांची उत्पन्न मर्यादा वाढवून एक लाख रु. करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

ओबीसी प्रवर्गासाठी उत्पन्न मर्यादा आठ लाख केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचे स्वागत केले आहे. सध्या महागाईने सर्वच ठिकाणी टोक गाठलेले असून, आरोग्य, स्वयंरोजगार अशा विविध सरकारी योजनांसाठी पिवळे व केशरी रेशनकार्डसाठी असलेली उत्पन्न मर्यादा हाच निकष लावला जातो. ही उत्पन्न मर्यादा कमी असल्यामुळे निम्न मध्यम वर्गातील नागरिक योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. महागाई वाढली असताना आज प्राधान्य गटासाठी शहरी आणि ग्रामीण अशी उत्पन्नाची विभागणी न करता दोन्ही ठिकाणी सरसकट एकच निकष लावून ही मर्यादा वाढवावी. रेशन कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.









Post Bottom Ad

JPN NEWS

Pages