अंधेरी ते दहिसर मेट्रोसाठी जागा देण्यास सुधार समितीची मंजूरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2017

अंधेरी ते दहिसर मेट्रोसाठी जागा देण्यास सुधार समितीची मंजूरी


मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून अंधेरी घाटकोपर मार्गावर मेट्रो रेल्वे सुरु करण्यात आली. याला प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यानंतर होऊ घातलेल्या प्रकल्पात बाधित लोकांच्या पुनार्वसनावरुन शिवसेनेने विरोध केला आहे. मात्र बुधवारी अंधेरी ते दहिसर मार्गावर चालवण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वे मार्गात उद्याने आणि मोकळ्या जागा जात नसल्याने या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने मेट्रोसाठी रेल्वे स्टेशन, जिने, लिफ्ट, भुयारी मार्गासाठी जागा देण्याचा प्रस्तावाला पालिकेच्या सुधार समितीची मंजूरी मिळाली आहे. यामुले आता अंधेरी ते दहिसर या मार्गावरील मेट्रोचे काम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईत होणार्‍या सात मेट्रो रेल्वे मार्गांपैकी वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपर हा एकच मार्ग सुरू झाला असून इतर मार्गांचे बांधकाम सुरू आहे. यामधील दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो रेल्वे मार्ग क्रमांक ७ साठी स्टेशन उभारणे, भुयारी मार्ग बनवणे, लिफ्ट, जिने अशा सुविधांसाठी जागा आवश्यक आहे. यासाठी महापालिका हद्दीतील जागेचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मांडण्यात आला. या मार्गातील मेट्रोसाठी जागेचा वापर करताना नागरिकांच्या हिताला कोणत्याही प्रकारच्या फटका बसत नसल्याची भूमिका सदस्यांनी मांडली. त्यामुळे या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. मुंबईत होणार्‍या ७ मेट्रो मार्गांपैकी अनेक मार्गात नागरिकांसाठी आरक्षित असणारी उद्याने, मैदाने, राहत्या इमारती बाधित होत आहेत. यामध्ये आरे कॉलनीत होणारा मेट्रो कारशेड, वर्सोवा मलनि:सारण यांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताआड येणार्‍या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोधच राहील अशी भूमिका सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी मांडली. झपाट्याने औद्योगिकरण होणार्‍या या शहारात मोकळी मैदाने, उद्याने ही मुंबईची फुप्फुसे आहेत. त्यामुळे अशा जागांमधून जर मेट्रो जात असेल तर शिवसेना विरोध करेल असेही नर यांनी सांगितले. मेट्रो रेल्वे ७ प्रकल्पासाठी मौजे गुंदवली, चकाला, मालाड, आकुर्ली, मागाठाणे, दहिसर येथील जमिनीचा विकास योजनेतील वापर बदलून मेट्रो रेल्वे स्टेशन आणि इतर अनुषंगिक कामांसाठी होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS