मुंबई | प्रतिनिधी
मुंबईत स्वच्छता राखणे हि काही ठरावीक लोकांची जबाबदारी नाही. दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छेतेच्या दृष्टीने जबाबदारी स्विकारावी, असे आवाहन खासदार व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी मुंबईकरांना केले आहे. 'मुंबई फर्स्ट' आणि 'अपनालय' या संस्थेच्यावतीने व महापालिकेच्या सहकार्याने एम पूर्व विभागाच्या स्वच्छतेसाठी सचिन तेंडूलकर यांनी मिशन २४ ही मोहीम प्रायोगिक तत्वावर सुरु केली. मुंबई महापालिका मुख्यालयात या मोहीमेचे तेंडूलकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी सचिन तेंडुलकर बोलत होते.
मुंबईत कचराच्या समस्या मोठी आहे. स्वच्छतेबाबत महापालिका मोठ्या प्रमाणात जनजागृती करते. परंतु, कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. कचरा ही देशाभरातील समस्या आहे. ती ठरावीक लोकांनी किंवा एक- दुसऱ्याकडे बोट दाखवून सुटणार नाही. देवनार व शिवाजी भागातील लोक घरांच्या खिडक्यामधून कचरा थेट फेकून देतात. मी स्वतः देवनारला जाऊन आलो. तेथे खूप भयानक स्थिती आहे. देवनार डम्पिग ग्राऊंड म्हणजे दहा मजल्याची कचऱ्याची इमारत आहे. जी तुमच्याकडे आवासून पाहतेय. एका बदल दिवसात हा बदल होणार, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे काम कठीण असले तरी, अशक्य काहीच नाही. त्यामुळे मुंबईकरांनी अॅम्बेसेटर म्हणून काम करायचे आहे. प्रत्येक व्यक्तिने मनात आणंल तर ही समस्या सोडविण्यास नक्कीच यश मिळेल, असे आवाहन तेंडूलकर यांनी मुंबईकरांना केले. तसेच मुंबईतील एम पूर्वमधील देवनार, शिवाजीनगर, गोवंडी, चेंबूर भागात झोपडपट्टीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा भाग चांगल्या सोयी सविधांनी परिपूर्ण कसा असले, असा दुष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मुंबई फस्ट व अपनालय संस्थेनी सहभाग घेतला आहे. स्वच्छता दूत म्हणून मला जे काही करता येईल, ते करण्याचा माझा प्रयत्न असले, असे तेंडूलकर यांनी सांगितले.
झोपड्यांमध्ये पाणी, शिक्षण ,आरोग्य, मोकळ्या जागा, गटारे अशा सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहे. त्या प्राधान्यांनाने देण्यावर महापालिकेचा भर असेल, तसेच झोपड्यांमध्ये जमा होणारा कचरा महापालिका उचलणार असून त्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही पालिकेची राहील, असे पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले