महापालिकेकडून प्लास्टीक बंदीच्या हालचाली सुरु - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिकेकडून प्लास्टीक बंदीच्या हालचाली सुरु

Share This

मुंबई । प्रतिनिधी -
प्लास्टिक वापरु नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती महापालिकेकडून केली जाते.तरीही नागरिकांकडून आणि फेरीवाले व दुकानदारांकडून प्लास्टिक थैल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या प्लास्टिकच्या अति वापरामुळे मुंबईत पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा झाला होता यामुळे प्लास्टिकवरच बंदी आणण्याच्या हालचाली पालिकेने सुरु केल्या आहेत.

मुंबईत प्लास्टिकच्या सरसकट वापरावर बंदी घालण्याचा प्रस्ताव सन २००७ मध्ये प्रथम प्रस्ताव चर्चेत आला. प्लास्टिकवरील बंदी यशस्वी करणाऱ्या शिमला शहराचा दौराही पालिका अधिकाऱ्यांनी केला. याबाबतचा प्रस्ताव पुढे राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, प्लास्टिकचा उपद्रव सुरू राहिला, तरी कालांतराने प्लास्टिक बंदीची चर्चा बारगळली. दरम्यान, २९ आॅगस्ट आणि मंगळवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने, प्लॅस्टिकचा धोका पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, पालिकेचे ३५ हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. मात्र, प्लास्टिकचा कचरा पाणी वाहून नेण्याच्या मार्गात मोठा अडथळा ठरल्याचे दिसून आले. पालिका कर्मचाऱ्यांनी नाले व गटाराच्या तोंडावरील कचरा काढून पाण्याचा निचरा केला. मात्र, प्लास्टिकवर बंदी घालण्याचा प्रश्न कायम राहीला आहे. यामुळे पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाऱ्या प्लास्टिकचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो अंमलात आणला जाईल, असे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages