खत निर्मिती करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत द्या - भाजप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खत निर्मिती करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत द्या - भाजप

Share This

मुंबई | प्रतिनिधी -
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईत सुका आणि ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणाऱ्या सोसाट्यांना मालमत्ता करात पाच ते दहा टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांकडे केली. भाजपाने केलेल्या या मागणीबाबत पालिका आयुक्त सकारात्मक असल्याची माहिती माजी नगरसेवक व उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार यांनी दिली.

मुंबईत कचऱ्याचा प्रश्न गहन आहे. सध्या स्वच्छ मुंबई योजनेअंतर्गत सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. अनेक सोसायट्यांनी या मोहिमेत भाग घेतला असून कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करत आहेत. मुंबईत बहुतांश छोट्या सोसायट्या असून त्यांना अार्थिक पाठबळ मिळत नसल्याने किंवा कमी पडत असल्याने कचऱ्यापासून कंपोस्टिंग करुन खत निर्मितीसह अपयश येत आहे. त्यामुळे नगरसेवक निधीतून अशा सोसायट्यांना मदत करण्यास नगरसेवकांना परवानगी द्यावी, कंपोस्ट खत निर्मिती करणाऱ्यांना सोसायट्यांना मालमत्ता करात पाच ते दहा टक्के सवलत द्या, अशी मागणी शेलार यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेवून केली. उत्तर मुंबईतील भाजपचे नगरसवेक यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. तसेच मालाड येथील रस्त्यांवर मुलभूत सुविधा दिवा बत्ती, मुंबईतील गरिब विद्यार्थ्यांसाठी एकलव्य अभ्यासिका, सार्वजनिक शौचालयांमध्ये पाणी आणि वीजेची सोय करुन द्यावी, अशा विविध मागण्यां केल्या. या मागण्यांबाबत महापालिका आयुक्त सकारात्मक असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages