आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी

Share This
मुंबई । प्रतिनिधी -  
19 व 20 सप्टेंबरला मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसात पोयसर नदीकाठी राहणाऱ्या दुर्गा नगर, गोकुळ नगर, आनंद नगर येथील काही घरे पूर्णपणे उध्वस्त झाली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधितांच्या पुनर्वसनाचा मार्ग दिंडोशी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील प्रभू यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. यामुळे या बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

दिंडोशीचे शिवसेनेचे आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी पुढाकार घेऊन त्यांनी पी उत्तर विभागाच्या सहाय्यक पालिका आयुक्त संगीता हसनाळे यांच्यासह या बाधित भागांना भेट देऊन त्यांच्या घरांच्या झालेंल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी येथील उध्वस्त झालेल्या 5 ते 6 घरांचे त्वरित दुसरीकडे घरे पालिकेने द्यावीत व बाधित नागरिकांना देखील निवारा उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रभू यांनी केली.

तसेच बाधित घरांना मालाड पूर्व येथेच स्थलांतर द्यावे अशी आग्रही मागणी आमदार सुनिल प्रभु यांनी सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळ यांच्याकडे केलीे. यावेळी बाधित नागरिकांना तातडीचा निवारा म्हणून सध्या पालिकेकडे उपलद्ध असलेले 225 चौफूट घर आणि नंतर 269 चौफूट घर देण्यात येईल असे आश्वासन संगीता हसनाेळे यांनी दिल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली.

यावेळी उपविभागप्रमुख विष्णू सावंत, नगरसेविका विनया विष्णू सावंत,नगरसेवक आत्माराम चाचे, माजी आरोग्य समिती अध्यक् प्रशांत कदम,शाखा प्रमुख प्रदीप निकम, विजय गावडे, दादा पालेकर यांच्यासह, कार्यकारी अभियंता यालप्पा गायकवाड,सहाय्यक अभियंता अमित जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रभू यांनी मुसळधार पावसात उध्वस्त झालेल्या आम्हा बाधित नागरिकांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली अशी माहिती येथील नागरिक व विशेष करून महिलावर्गाने दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages